वार्ताहर/सांबरा
कणबर्गी येथे महाशिवरात्रीनिमित्त गुऊवार दि. 27 रोजी श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला महाप्रसादाचे आयोजन केले जाते. यानिमित्त मंगळवारी गावातून सुशोभित गाड्याची मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत बुधवारी रात्री सदर मिरवणूक श्री सिद्धेश्वर मंदिर येथे पोहोचली. गुऊवारी सकाळी मंदिरात अभिषेक, पूजा कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे पूजन करून सकाळी दहा वाजता महाप्रसाद वाटपाला सुऊवात करण्यात आली. मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांनी फुलून गेला होता. भाविकांना श्रींचे दर्शन घेता यावेत म्हणून खास व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर परिसरात भव्य मंडप उभारला होता. सायंकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती. श्री सिद्धेश्वर व्यवस्थापक मंडळ व ग्रामस्थांनी महाप्रसाद वाटपासाठी अधिक परिश्रम घेतले.









