वार्ताहर/कडोली
येथील ऐतिहासिक जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती कडोलीतील कचेरी गल्लीतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सादर केलेला देखावा पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत आहे. सुमारे 1100 साली स्थापित झालेल्या कडोली येथील ग्रामदैवत आणि जागृत देवस्थान श्री कलमेश्वर देवालयाची मोठी ख्याती आहे. जुन्या काळातील मंदिराची इमारत आहे. त्या अवस्थेत मजबूत आहे. अशा या मंदिराची इमारत हुबेहूब तयार करीत कचेरी गल्लीतील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सर्व भक्तांना सुखद धक्का दिला आहे. मंदिरामध्ये पुरातन काळातील ज्या ठिकाणी मूर्ती स्थापित आहेत अशा सर्व ठिकाणी जशास तशा प्रकारच्या मूर्ती दाखविण्यात आल्या आहेत. असा हा देखावा पाहण्यासाठी कडोली आणि पंचक्रोषीतील महिला, ग्रामस्थ, भक्त गर्दी करत आहेत.









