कणकवली / प्रतिनिधी
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष व राष्ट्रवादीच्या सदस्या मिताली सावंत यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. आमदार नितेश राणे यांनी यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सौ मिताली सावंत ह्या पूर्वीच भाजपाच्या गटामध्ये सामील झाल्या होत्या. त्यांनी देवगड जामसंडे नगरपंचायतीमध्ये भाजपाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या राष्ट्रवादीतच होत्या. आज त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. गेले दोन अडीच वर्षात शिवसेनेची सत्ता असून देवगड-जामसंडे नगरवासियांना विकास पाहता आला नाही. याशिवाय कचरा, आरोग्य, स्ट्रीट लाईट, रस्ते व अन्य विकास कामे यांचे अनेक प्रश्न निर्माण झाले. देवगड जामसांडे नगरपंचायतीचा विकास व्हायचा असेल तर आमदार नितेश राणे हाच शेवटचा पर्याय आहे. यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून मिताली सावंत यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत विजय कदम, आनंद देवगडकर राजेश सावंत यावेळी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









