वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अखिल भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या (पीसीआय) अध्यक्षपदी दोनवेळा पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या देवेंद्र झेझारिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी पीसीआयचे अध्यक्षपद दीपा मलिक यांच्याकडे होते.
42 वर्षीय पॅरा अॅथलिट आणि भालाफेक धारक देवेंद्र झेझारिया यांनी 2004 च्या अॅथेन्स तसेच 2016 च्या रिओ पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली होती. 2017 साली देवेंद्र झेझारिया यांचा भारतीय शासनातर्फे खेलरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. 2004 साली त्यांना अर्जुन पुरस्कार तर 2012 साली पद्यमश्री पुरस्कार मिळाला होता. गोव्याचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण आणि पंच जयवंत हमण्णावर यांची अखिल भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या सरचिटणीसपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.









