Devendra Fadnvis On Sanjay Raut : राज्यातील सरकार जास्त दिवस राहणार नाही.भाजपलाच सरकार नकोय.जितके दिवस सत्तेत राहतील तितकं भाजपचं नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री बदलणं म्हणजे सरकार जाणं असंच आहे. मी जे म्हणतोय त्याची माहिती घ्या. मंत्रालयात मंत्री जात नाहीत. काय चाललंय तुम्ही फडणवीसांना विचारा अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ ट्विट करत नाव न घेता निशाणा साधला.
काय म्हटलयं व्हिडिओमध्ये
राजकारणातही काही कुस्त्या सुरु आहेत. आपल्याला माहित आहे जस कुस्तीत डोपिंग आलं तसं काही पैलवान नशा करून कुस्ती खेळू लागले म्हणून त्यांना बाद करण्यात आलं. आमच्या राजकारणातही अलीकडे काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात.पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतून बादचं व्हाव लागतं, असा टोला नाव न घेता संजय राऊत यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावाला. यावेळी ते म्हणाले की, जे असले मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात तुमच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात आम्ही कुस्ती जिंकलीय 2024 ला देखील जिंकणार असा दावाही त्यांनी केला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बोलायला लावू नका
आमची नशा शुद्ध आहे. तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलत आहात. ही भांग अत्यंत वाईट. तुमच्या आसपास नशेबाज कोण आहेत हे मला बोलायला लावू नका. उद्धव ठकारे यांच्या सभा, माझं बोलणं आणि महाविकास आघाडीची तुम्हाला भीती वाटत आहे, असा पलटवार राऊत यांनी केला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








