राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह अन्य भाजपा नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांचा अपमान करण्यात आला.तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी मुख्यमंत्री बोम्मईंची विधान,राज्यातील प्रकल्पांची पळवापळव,महागाई आणि बेरोजगारी या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने ‘हल्ला बोल’ मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होत. या मोर्चानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला नॅनो मोर्चा म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर मविआ नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरु केली आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवर मोर्चाचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांच्यावर टिका केली. याला आज फडणवीसांनी प्रत्यूत्तर दिले आहे. संजय राऊत यांनी ‘मराठा मोर्चा चा’ व्हिडिओ पोस्ट करून मविआचा मोर्चा हा नॅनो मोर्चा होता यावर शिक्कामोर्तबच केले असल्याचे म्हटले आहे.
काय म्हणाले फडणवीस
विरोधी पक्ष आपल अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचा मोर्चा नॅनो मोर्चा ठरल्यामुळे ते आत्मचिंतन करत आहेत. म्हणूनच आपल अस्तित्व माध्यमांच्या माध्यमातून गेले पाहिजे असे त्यांचा प्रयत्न आहे. काल संजय राऊत यांनी मराठा मोर्चाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला. यातूनच लक्षात येतेय त्यांचा मोर्चा नॅनो झाला आहे. त्यांच्यावर थोडा मानसिक परिणाम झाला असल्याचेही ते म्हणाले.
संजय राऊत यांच ट्विट
देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी..हे वागणे बरे नाही. जय महाराष्ट्र!
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









