Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : हिमंत असेल तर महिनाभरात महानगरपालिकेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा. देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक आहे असं समजून निवडणुकांना सामोरं जा असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी काल केलेलं भाषण निराशाजनक होतं. त्यांनी नैराश्येतून वक्तव्य केल्याची टिका त्यांनी यावेळी केली आहे. ते नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘मुद्दई लाख बुरा चाहे, तो क्या होता है, वही होता है जो तकदीर मे लिखा होता है’. २०१९ मध्ये ही माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस एनसीपी आणि शिवसेना तिघांनी मिळून मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अडीच वर्षात मला संपवू शकले नाहीत. यापुढेही तुम्ही मला संपवू शकणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
पुढे बोलताना ते म्हणाले, उद्धव ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबत निवडून आले नव्हते. मोदीजींचा फोटो लावून निवडणूक लढवली होती. आम्ही कायदेशीर निवडून आलो आहोत. मात्र, तुम्ही आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर खुपसला.तेव्हाच का राजीनामे दिले नाहीत असा सवाल करत घणाघात केला.
NIAच्या कारवाईवर बोलणं योग्य नाही
राज्यात सुरु असलेल्या एनआयएच्या छापेमारीबाबत बोलताना ते म्हणाले की, जी काही छापेमारी सुरू आहे ती कॉर्डीनेटेड स्वरुपाची ॲक्शन आहे. त्या ॲक्शनवर आता बोलणं योग्य नाही, योग्य वेळी मी बोलेन असेही ते म्हणाले.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
हिमंत असेल तर महिनाभरात महानगरपालिकेच्या आणि राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका घेऊन दाखवा. देवेंद्र फडणवीसांची ही शेवटची निवडणूक आहे. तर आपली ही पहिली निवडणूक आहे, असं समजून निवडणुकांना सामोरं जा. मुंबईवर सध्या गिधाड फिरत आहेत. लचके तोडणारी औलाद फिरत असल्याचा घणाघात त्यांनी केला होता. तुम्ही जमीन दाखवा आम्ही तुम्हाला अस्मान दाखवू, असे जाहीर आव्हान अमित शहा यांना दिलं होतं.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








