सावंतवाडीत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष
सावंतवाडी । प्रतिनिधी
भाजप विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर ते मुख्यमंत्री बनणार आहेत. उद्या मुंबईत त्यांचा शपथविधी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी भाजप कार्यालयासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आणि घोषणा देत जल्लोष केला. यावेळी भाजपचे तालुका मंडळ अध्यक्ष महेश धुरी ,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर ,माजी नगरसेवक मनोज नाईक ,आनंद नेवगी, चंद्रकांत जाधव ,मधुकर देसाई यावेळी उपस्थित होते.









