ऑनलाईन टीम/ तरुण भारत
देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय बॉम्ब फोडत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली. आज त्यांचा शपथविधी पूर्ण होईल असेही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस हे स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील असेही फडणवीस यांनी माहिती दिली.राज्यपालांच्य़ा भेटीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माध्यमांशी संवाद साधला.महाराष्ट्रातील घडोमोडीनंतर नवं सरकार येत आहे त्याची हि पहिलीच पत्रकार परीषद आहे. (Eknath Shinde Live Update)
2019 च्या निवडणुकीत भाजपला 105 जागा मिळाल्या होत्या मात्र जनमताचा अनादर करत हे महाविकास सरकार सत्तेत आलं. महाविकास आघाडी सरकारने जन्मताच अपमान केला. गेल्या अडीच वर्षात प्रचंड भ्रष्टाचार झाला. महाविकास आघाडीतील दोन मंत्री तुरुंगात गेले असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कॅबिनेटची बैठक घेण्या अगोदर राज्यपालांचे पत्र घेणे आवश्यक असतं मात्र महाविकास आघाडी सरकारने ही कॅबिनेटची बैठक बोलावली. जाता जाता नामांतर करून गेले मात्र नामांतराचे निर्णय हे अवैद्य आहेत. त्यामुळे आमचं भाजप सरकार नव्याने नामांतर मंजूर करून घेईल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.









