भाजपने आता नवा राजकीय धक्का दिला आहे. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार आहे.असा आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे.याची माहिती भाजपाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा (J.P.Nadda) यांनी दिली. फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखवला. त्यांनी आता मंत्रिमंडळात सहभागी व्हावं आणि उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्विकारावा असा केंद्राचा आदेश असल्याचे त्यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं मुख्यमंत्रीपदी नाव जाहीर होताचं भाजपाने पहिली प्रतिक्रिया दिली.
भाजपाच्या केंद्रातील टीमने असं ठरवलं आहे की, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे. पदाची लालसा नाही हे फडणवीसांनी दाखवलं आहे. म्हणनूच त्यांनी आता मंत्रिमंडळात सहभागी व्हावं. उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्विकारावा असा निर्देश काढण्यात आला आहे असे त्यांनी सांगितलं.
फडणवीसांनी व्यक्तीगत सहकारातून बाहेर राहून समर्थन देणार असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. मात्र त्यांनी मंत्रिमंडळात रहाव असा आदेश देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपाचे संपूर्ण समर्थन मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेचा विकास करणे हे आमच्या पक्षाचे काम आहे. येथे पदाला महत्त्व नाही. तर कामाला महत्त्व दिले जाते हे फडणवीसांनी दाखवून दिले आहे असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









