ऑनलाईन टीम/ तरुण भारत
मविआ सरकार देवाच्या भरवश्यावर चाललंय. शेवटी आज वरुणराजा प्रसन्न झाला. त्याला दया आली सकाळपासून उन्हात बसलेल्या बंधू-भगिनींना थोडा का असेना त्याने आधार दिला. मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) सरकार नाही तर कार चालवतात. जलआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मविआवर हल्लाबोल केला.
हेही वाचा-सुप्रिम कोर्टाला माजी न्यायाधीशांनी केले पत्राद्वारे आवाहन
पुढे बोलताना ते म्हणाले, अडीच वर्षात तसूभर योजना पुढे गेली नाही. या सरकारला फक्त चालु असलेल्या कामांना स्थगिती आणि आपल्या कामांचे उद्गघाटन करणे एवढेच काम येते. भाजप सरकार गेलं आणि काम ठप्प झालं. पण आता जनतेच्या जल आक्रोशासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत. दानवेंमुळे पाण्यासाठी १२९ कोटी मिळाले. मात्र मविआच्या नाकर्तेपणामुळे ही वेळ आली आहे. आमच्या माता भगिणींना पाणी मिळत नसेल तर संघर्ष करणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.
हेही वाचा- परिवहन मंत्र्यांना ईडीचा आदेश; पण परब साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला
जनतेने तुम्हाला मिरवण्यासाठी सिहासनावर बसवले नाही. सरकारला आता आक्रोशाची दखल घ्यावीच लागेल. कारण त्यांना जाग आणण्यासाठी हा मोर्चा असल्याचेही त्यांनी सांगितले. समस्या सुटणार नसतील तर सिंहासन सोडा असे आव्हानही दिले. मराठवाड्यातील पाणी टंचाईवर टीका करताना ते म्हणाले, मविआ सरकारने मराठवाडा वाॅटर ग्रीडचा खून केला आहे. हे सरकार पाण्याचे शत्रु आहे. सत्तेवर येताच वैधानिक विकास मंडळाची हत्या केली. या सरकारमध्ये मराठवाड्यातील मंत्री आहेत पण त्यांनी याविषय़ी चूपी बाळगली आहे. हे नेते टक्केवारी, सत्तेत खूष आहेत. त्यांना सामान्य माणसाच्या समस्येचे घेणेदेणे नाही असा आरोपही त्यांनी केला.