आपलं सरकार आल्यानंतर काल जल्लोष करण्यात आला. आता सर्व उत्सव जोरात साजरे करायचे.आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत.तुम्हालाही घरी बसवणार नाही, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला. आज ते मुंबईत बोलत होते.
आपण शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत. मुंबई मनपावर शिंद गट- भाजपाची सत्ता असेल. आशिष शेलार पक्षाचे शिलेदार आहेत. मुंबईची मोहीम फत्ते करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. शेलारांना टी-२० कसं खेळायचं माहित आहे. एखादा अडथळा आला तर किक कशी मारायची माहित आहे. त्यामुळे शेलार हा सामना जिंकणारचं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्यावेळी ३५ वरून ८२ वर गेलो. यावेळी रेकाॅर्ड मोडायचा आहे असेही ते म्हणाले.
Previous Articleअंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Next Article बसवन कुडचीत बिबट्या सदृश्य प्राणी








