Maharashtra Assembly Winter Session 2022 : संतांना जातीपातीच्या राजकारणात का अडकवता? महापुरुषांबाबत बोलताना परबांनी सावरकरांचा एकदाही उल्लेख केला नाही. संताचा अपमान काहीजण करतात ते चुकीचं नाही का? वारकऱ्यांवरील सुषमा अंधारेंच्या विधानावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले .राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात पण तुम्ही काही बोलत नाही. राहुल गांधी सावरकरांना माफीवर म्हणतात आणि त्यांच्यासोबतच फिरता.सावरकरांच्या अपमानाबद्दल का बोलत नाही? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ नेत्यांना केला. सावरकरांना भारतरत्न मिळाला नाही तरी चालेल पण त्यांचा अपमान थांबवा, असेही ते म्हणाले.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, संजय राऊत महाराजांचा उल्लेख शिवाजी म्हणून करतात. राऊत बाबासाहेबांच जन्मस्थळ चुकीचं सांगतात असेही ते म्हणाले. महापुरुषांच्या वक्तव्यावरून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघालं होत. आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात निवेदन देत असताना काही सवाल उपस्थित करताच सभागृहात गोंधळाच वातावरण तयार झालं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








