सरपंच सूर्यकांत घाडी : पंचायतीतर्फे घरोघरी कचरा पिशवी
सुरेश बायेकर /सांखळी
डिचोली तालुक्मयातील सुर्ल पंचायत क्षेत्रात मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गावच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचायत मंडळ प्रयत्न करत आहे. घरोघरी मोफत शौचालय, सार्वजनिक शौचालय, रस्ते, पायवाट, झर सुशोभिकारण इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली असून अनेक कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, वन विभागाच्या सहकार्याने पंचायत क्षेत्रात विविध फळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी विविध सामाजिक आर्थिक विकास कामना चालना दिली आहे, असे सरपंच चंद्रकांत घाडी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
सुर्ल ग्रामपंचायत क्षेत्रात वनविभागाने मोटय़ा प्रमाणात फळ झाडांच्या रोपांची लागवड केली आहे.त्यातील काही झाडांना फळे आली असून भविष्यात आंबे, लिंबू, जाम, पेरू, जांभळं आदी फळे गावातील नागरिकांना उपलब्ध होणार आहेत. 10 हजार चौ.मी. जागेवर ही झाडे लावण्यात आली आहेत. वनविभाग आणि ग्रामपंचायत मंडळने गावात देवराई रक्षण व्हायला हवी यासाठी ही पावले उचलली असल्याचे सरपंच घाडी यांनी सांगितले.
गावातील शेतकऱयांना सरकारने बरेच सहकार्य केले असून सुमारे चाळीस शेतकऱयांना संघटित करून सुर्ल गावात सामूहीक शेतीचा प्रयोग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला आणि तो यशस्वी झाला. यासाठी ग्रामपंचायत कार्यालयातून शेतकऱयांना सहकार्य लाभले. यासाठी सरकारने खास अधिकारी नियुक्त केले होते. सुर्ल गावात पाण्याची समस्या भटकी गुरे आणि रानटी जनावरे या मुळे पिकाचे नुकसान होत असल्याने 60 टक्के शेती लागवडी खाली आजही येत नाही असे स्थनिक शेतकऱयांचे म्हणणे आहे.
सुर्ल स्वच्छतेत अव्वल
डिचोलीतील सुर्ल हे गाव स्वच्छतेत अव्वल असून गावातील बाराही वाडय़ाववर घराघरात कचरा गोळा करण्यासाठी पिशवी देण्यात आल्या आहेत. तर दुकानदाराना आणि धार्मिक मंदिर व्यवस्थापनांना कचरा कुंडी देण्यात आली आहे. गावात स्वतंत्र कचरा व्यवस्थापन असून तेथे कचऱयाचे विभाजन केले जात असून सुर्ल गाव सर्वत्र स्वच्छ दिसत आहे.
दहा वर्षात गावाची प्रगती
सांखळी मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या दहावर्षात सुर्ला गावाने बरीच प्रगती केली आहे. गावासाठी स्वतंत्र पंचायत घर, माध्यमिक विद्यालय, सभागृह, रस्ते, पूल, बंधारे, गटार बांधणी, नाळ-वीज जोडणी गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विविध सरकारी योजना, नोकरी उपलब्ध करून देण आदी कामे सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. येथील बाये-मडकईकरवाडा हा रस्ता सरकारने करून घेतला हे आमदार सावंत यांचे यश समजले जाते असे स्थनिकांनी सांगितले.









