वार्ताहर/नंदगड
खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक रविवारी होणार आहे. दोन पॅनेल एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अन्य काही जणांचाही रिंगणात समावेश आहे. विकास पॅनेलकडून जोरात प्रचार सुरू आहे. शुक्रवारी बँक विकास पॅनेलच्या उमेदवारांनी बेळगाव, गर्लगुंजी, पिरनवाडी, मच्छे, मजगाव, इदलहोंड, बरगाव, मणतुर्गा, नंदगड, खानापूर शहरातील विविध भागात प्रचार केला. प्रचारादरम्यान आपली ध्येयधोरणे त्यांनी आपल्या मतदारांना पटवून दिली. बँकेच्या विकासासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी मतदारांना दिली. मतदारांनीही त्यांना आपापल्यापरीने बऱ्यापैकी पाठिंबा व्यक्त केला. यावेळी उमेदवारांसह त्यांचे समर्थक प्रचारार्थ सहभागी झाले होते.









