मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : होंडा पंचायत नवीन इमारतीचे लोकार्पण
वार्ताहर /होंडा
गावाचा विकास म्हणजेच राज्याचा विकास असून तो करण्यासाठी ग्रामपंचायत महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक पंचायत पातळीवर स्वयंपूर्ण मित्राव्दारे सरकारच्या योजना गावातील प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आत्मनिर्भर भारत व स्वयंपूर्ण गोवा बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पेले. होंडा पंचायतीच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते. व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वज़ित राणे, पर्येच्या आमदार डॉ. देविया राणे, सरपंच शिवदास माडकर, साधन सुविधा महामंडळाचे हरिष तसेच इतर पंचायत सदस्य उपस्थित होते.
प्रत्येक गावात साधन सुविधायुक्त पंचायत व्हावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. होंडा सारख्या गावात 3 कोटी ऊपये खर्च कऊन उभारलेल्या सुसज्ज इमारतीचे, लोकार्पण करताना आनंद होत आहे. पंचायत पातळीवर विकास हा झालाच पाहिजे. पंचायतीच्या विकासात पंच सभासदांचा मोलाचा वाटा असतो. विकास करताना ग्रामस्थांना कसा फ्ढायदा होईल याचा विचार करावा, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले. होंडा पंचायत इमारतीची पायाभरणी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी केली होती. त्यांनी सत्तरीचा विकासाला सुऊवात केली. त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आपला प्रयत्न आहे. होंडाला शहराचे ऊप देण्यात येणार असून लवकर विविध प्रकल्प आणून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. आज होंडा पंचायतीला सुसज्ज इमारती प्राप्त झाली आहे. होंडाचा विकास करण्यासाठी सरकारबरोबर राहून ग्रामस्थांचा विश्वास संपादन कऊन पुढे गेले पाहिजे. आमदार देविया राणे यांच्यामुळे पर्ये मतदारसंघाच्या विकासाला गती प्राप्त झाली आहे. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या पाठिशी राहून गावच्या विकासात आपला सहभाग दाखवावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पंचायत नामफलकाचे अनावरण व फित कापून इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सरपंच शिवदास माडकर यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.









