पर्यटक व्यावसायिकांच्यावतीने आ.निलेश राणेंचा विशेष सत्कार
मालवण | प्रतिनिधी
भूमिगत वीज वाहिन्या, ट्रान्सफार्मर यांसह मोठया प्रमाणात विकासनिधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. भविष्यातही होणार आहे, असे सांगत वायरी परिसरातील ग्रामस्थ व पर्यटक व्यावसायिक यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.यावेळी देवानंद लोकेगावकर, मिलिंद झाड, केदार झाड, रवींद्र खानविलकर, दाजी सावजी, मुन्ना झाड, गणेश सातार्डेकर, शाम झाड यांसह अन्य पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.आमदार निलेश राणे यांच्या सहकार्यातून येथील वीज समस्या सोडवण्याच्या दृष्टीने भूमिगत वीज वाहिनी टाकणे व ट्रान्सफार्मर उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. स्मशानशेडसाठी आमदार निलेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून 20 लाख निधी मंजूर केला. तसेच अन्य विकास कामांचे प्रस्ताव आमदार निलेश राणे यांच्याकडे देण्यात आले. यात निशाणकाठी देवस्थान पर्यटनदृष्ट्या विकसित करणे. समुद्र किनाऱ्यावर जाणारे जोडरस्ते डांबरीकरण रुंदीकरण करणे. यांसह विकासकामांबाबत निवेदन देण्यात आले. तसेच झालेल्या कामांबाबत आभार मानण्यात आले.
फोटो : वायरी परिसरातील ग्रामस्थ व पर्यटक व्यावसायिक यांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. (अमित खोत, मालवण)









