मनपा आयुक्तांना वाल्मिकी समाजाचे निवेदन
बेळगाव : बसवण कुडची येथील बेडर समाजाच्या स्मशानभूमीचा विकास करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवार दि. 6 रोजी महापालिका आयुक्तांना बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाजाच्यावतीने निवेदन देण्यात आले. महानगरपालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या बसवण कुडची गावातील बेडर समाजाच्या स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली आहे. त्या ठिकाणी संरक्षण भिंत खराब झाली असून, ती तातडीने नव्याने बांधण्यात यावी, गेटचे दरवाजे, विद्युतखांब, मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेड आणि पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात यावी, महानगरपालिकेच्यावतीने तातडीने विकासकामे हाती घेण्यात यावीत, स्मशानभूमीची जागा कमी पडत आहे, ती भरून रस्ता करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली.









