वृत्तसंस्था/ कलबुर्गी
25 हजार अमेरिकन डॉलर्स एकूण बक्षीस रकमेच्या आयटीएफ खुल्या कलबुर्गी आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सातव्या मानांकित देव जावियाने विजयी सलामी दिली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील झालेल्या सामन्यात देव जावियाने मनीष गणेशचा 6-4, 6-3 असा पराभव केला. हा सामना 72 मिनिटे चालला होता. त्याच प्रमाणे प्रज्वलदेव आणि आदिल कल्याणपूर यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीत अमेरिकेचा निक चॅपेल आणि भारताचा नितीन कुमार सिन्हा यांच्याकडून 2-6, 6-3, 3-10 असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात मनीष सुरेशकुमारने सिद्धांत बी. याचा 7-6 (7-4), 6-4 तसेच धिरज श्रीनिवासनने कोरियाच्या जेंग युनसिओकचा 6-0, 3-4 असा पराभव केला. या सामन्यात दुखापतीमुळे जेंगने स्पर्धेतून माघार घेतली.









