वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांचे उद्गार
शिरोडा : गोवा सरकारने वीज खात्यात क्रांती घडवण्याचा निर्धार केला असून जुन्या एसटी व एल टी कंडक्टर मुळे वीज खात्याला नुकसानी झेलावी लागत होती हा नुकसानी दर सुमारे 13 टक्के इतका होता मात्र जुन्या उपकरणांचा बदल करून त्या जागी नवीन उपकरणे आल्यावर हा नुकसानीचा दर एक अंकी एवढा होणार आहे.गोवा सरकार तर्फे वीज सुविधा अद्यावत करण्यासाठी व वीज उपकरणे नूतनीकरण करण्यासाठी सुमारे 1800 कोटी ऊपयांची तरतूद केली आहे तर केंद्र सरकार तर्फेही 789 कोटी ऊपयांची मंजुरी झाली आहे. अशी माहिती वीज मंत्री सचिन ढवळीकर यांनी पंचवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिली.पंचवाडी फीडरच्या भूमिगत वीज वाहिनी व विद्यमान ओव्हरहेड 11 केव्ही लाईनचे 2×10 न्न्A, 33/11 केव्ही पॉन्ट?मोल उपकेंद्रातून भूमिगत केबलिंग सिस्टीममध्ये रूपांतरित करण्याच्या कामाचा पायाभरणी कार्यक्रम पंचवाडी पंचायत सभागृहाजवळ करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाला वीज मंत्री सुधीन ढवळीकर यांच्यासह सहकार मंत्री सुभाष शिरोडकर व सावर्डेचे आमदार डॉ. गणेश गावकर आदी उपस्थित होते. मंत्री ढवळीकर यांच्या हस्ते शिलान्यासाचे उद्घाटन झाल्यानंतर पंचवाडी ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी व्यासपीठावर शिरोड्याचे आमदार तथा मंत्री सुभाष शिरोडकर, सावर्डेचे आमदार गणेश गावकर, शिरोड्याचे जिल्हा पंचायत सदस्य नारायण कामत , सावर्डेच्या जिल्हा पंचायत सदस्य सुवर्णा तेंडुलकर, पंचवाडीच्या सरपंच लीना फर्ना?डिस, शिरोड्याच्या सरपंच पल्लवी शिरोडकर ,सावर्डेच्या सरपंच चिन्मई नाईक, वीज खात्याचे मुख्य अभियंते राजीव सामंत, कार्यकारी अभियंते सुभाष देसाई, पंचवाडीचे उपसरपंच पाऊलो गुधीनो, शिरोड्याचे उपसरपंच सुनील नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलताना वीज मंत्री ढवळीकर यांनी गोव्यात दोन अत्याधुनिक सबस्टेशन उभारण्यात येणार असून वेर्णा येथे 250 कोटी ऊपये खर्चून तर झाली गाव येथे 350 कोटी ऊपये खर्चून नवीन सबस्टेशनने उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. गोमंतकीयासाठी 24 तास वीज देण्याचा प्रयत्न असून त्यासाठी गोवा सरकार अतोनात प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गोवेकरांची पडिंग शेती जमीन असल्यास ती सरकारला सोलर वीज निर्मिती प्रकल्प करण्यासाठी द्यावी असे आवाहनही वीजमंत्र्यांनी यावेळी बोलताना केले शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या पाच ते दहा एचपी सोलर पंप साठी ही शेतकऱ्यांनी पुढे येऊन नोंदणी करून हे पंप कमी किंमतीत घ्यावे असेही त्यांनी पुढे बोलताना सांगितले आगामी काळात 600 कोटी ऊपयांची कामे सुरू होणार असून. सुमारे 960 कोटी ऊपयांच्या कामांची सुऊवात झाली असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. गोवा सरकार हे सर्व प्रकल्प गोमंतकीय जनतेला उत्कृष्ट व दर्जेदार वीज उपलब्धी 24 तास मिळावी या हेतूने करत आहे , मात्र गोमंतकीय जनतेने वीज उपकरणाची साधन सुविधा निर्मितीच्या काळात होणारा त्रास शोषून सरकारला सहकार्य करावे. कोणत्याही सरकारी प्रकल्पाला लोकांचे सहकार्य लाभल्यास तो प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होतो असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी बोलताना मंत्री सुभाष शिरोडकर यांनी लोक सहकार्याने सामाजिक प्रकल्प उभे राहतात असे सांगितले वीज पाणी ही मूलभूत गरजा असून या सुरळीतपणे लोकांपर्यंत पोहोचणे हे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले मतदार संघात विविध विकास कामे भाजप सरकारच्या सहाय्याने सुरू असून वीज समस्या दूर करण्यासाठी गोवा सरकार तर्फे हे धाडसी पाऊल उभारण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले कुशल मनुष्यबळ निर्माण करतानाच प्रत्येक कामगाराने तळमळ घेऊन काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले दूरदृष्टी ठेवून कार्य केल्यास त्याचे फळ आगामी पिढीलाही होणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले 2047 सालापर्यंत लागणारे पाणी उपलब्ध करण्याची तयारी आपण जलस्त्राsत खात्यातर्फे मंत्री म्हणून काम करत असल्याचेही ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमदार गणेश गावकर यांनी यावेळी बोलताना गोवा सरकारने योग्य व्यक्तींना योग्य खाती दिली असून प्रत्येक मंत्री आपल्या खात्यातला योग्यरीत्या न्याय देऊन काम करीत असल्याचे सांगितले. मंत्री धवळीकर यांनी वीज क्रांती घडवण्याचा ध्यास धरला असून गोव्यातील विविध भागात भू विज वाहिनी व सुधारित वीज उपकरणे करण्याचे काम ते युद्ध पातळीवर करीत असल्याचेही आमदार गणेश गावकर यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरील अन्य मान्यवरांची भाषणे झाली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यकारी अभियंता सुभाष देसाई यांनी केले पंचवाडी येथील ग्रामपंचायत सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे व्यवस्थापनाची बाजू पंच सदस्य क्रिस्ते डीकोस्ता व अवधूत नाईक यांनी सांभाळली.









