बेळगाव : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण बनले आहे. उज्ज्वल गॅस योजनेच्या माध्यमातून घरातील धूर कमी करण्यात आला, पण गॅसचा दर गगनाला भिडल्याने पुन्हा चूल पेटविण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. त्यामुळे गॅसच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी काँग्रेसकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सर्वसामान्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत काँग्रेसला मत देऊन विजयी करावे, असे आवाहन काँग्रेस उमेदवार प्रभावती मास्तमर्डी यांनी केले. वडगाव परिसरातील दत्तात्रेय गल्ली, सपार गल्ली येथील घरोघरी जाऊन प्रचार करून मतदारांकडून आशीर्वाद मिळविला. या परिसरात खराब रस्ते, घाण व धुळीचे लोट आहेत. शिवाय पाण्याची समस्या नागरिकांना सहन करावी लागत आहे. तरुण आणि महिला नोकरीच्या शोधात आहेत. काँग्रेस सरकार त्यांना सर्वतोपरी मदत करेल, काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या पाच गॅरंटींबाबत स्पष्टीकरण देत या सर्व योजना अंमलात आणून सर्वसामान्य नागरिकांना लाभ मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष बांधील आहे. विणकरांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यासाठी मला बहुमतांनी येत्या निवडणुकीत निवडून द्या, अशी विनंती प्रभावती मास्तमर्डी यांनी केली.
Previous Articleमुरलीधर पाटील यांना हलगा गावचा पाठिंबा
Next Article खानापुरात पदयात्रा काढून काँग्रेसचा प्रचार
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









