क्रीडा प्रतिनिधी/बेळगाव
देसूर येथे झालेल्या देसूर विभागीय स्पर्धेत द.म.शिक्षण मंडळ संचलित देसूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.या स्पर्धेत मुलांच्या कब•ाr संघाने प्रथम क्रमांक मिळविला आहे
17 वर्षांखालील मुलांच्या गटात : सुजल निट्टूरकरने 400 मी. धावणे, 800 मी. धावणे, लांबउडी प्रथम, वेदांत आरगु 100 मी. धावणे तृतीय, शिवक चौगुले 200 मी. धावणे प्रथम, 400 मी. तृतीय, महेंद्र कुंडेकर 200 मी. द्वितीय, लांबउडी तृतीय, प्रथमेश साळुंखे 800 मी. द्वितीय, सोमनाथ निटूरकर 5 कि.मी. चालणे प्रथम, शौर्य निटूरकर गोळाफेक प्रथम, थाळीफेक तृतीय, समर्थ लोखंडे भालाफेक द्वितीय, श्रेयस गुरव 110 मी.अडथळा शर्यत द्वितीय क्रमांक पटकाविला. सांघिक स्पर्धेत व्हॉलीबॉल स्पर्धेत द्वितीय तर 4×400 रिलेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.
17 वर्षांखालील मुलींच्या गटात पुष्पा लक्केबैलकर 100 मी. द्वितीय, सानवी नाईक 200 मी. प्रथम, अडथळा शर्यत द्वितीय, रोहिनी वसुलकर 200 मी. तृतीय, 800 मी. प्रथम, उंचउडी प्रथम, मानवी गोरल थाळीफेकमध्ये तृतीय, लांबउडीमध्ये द्वितीय, मनाली गुरव 400 मी. द्वितीय, ममता चौगुले गोळाफेक तृतीय सांघिक, थ्रोबॉल स्पर्धेत द्वितीय, 4×400 रिले स्पर्धेत प्रथम, 14 वर्षांखालील स्पर्धेत प्राजक्ता पाटीलने 100 मी. प्रथम, उचउडी प्रथम, 800 मी. प्रथम, मिवळून वैयक्तिक सर्वसाधारण जेतेपद मिळविले. मुलींच्या सांघिक क्रीडामध्ये खो खो संघाने उपविजेतेपद मिळविले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक जे. एस. पाटील, क्रीडा शिक्षक व्ही. टी. कुकडोळकर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.









