येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
सार्वजनिक शिक्षण खाते आयोजित येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या देसूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
येळ्ळूर विभागीय क्रीडा स्पर्धेत सांघिक गटात मुलांच्या कब•ाr संघाने विजेतेपद तर मुलींच्या कब•ाr संघाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. यासह वैयक्तिक गटात 400 मी. धावणे स्पर्धेत कविता गोरेने प्रथम क्रमांक मिळविला. 200 मीटर धावणे विनायक मादार द्वितीय क्रमांक, अडथळा शर्यत सुजल मसुरकर प्रथम क्रमांक, विनायक मादार द्वितीय क्रमांक, कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनी गट प्रशांत वसूलकर प्रथम क्रमांक, 70 किलो वजनी गट लक्ष्मण कदम प्रथम क्रमांक, कराटे स्पर्धेत प्रशांत वसूलकर प्रथम क्रमांक व महेंद्र कुंडेकर द्वितीय क्रमांक असे क्रमांक पटकाविले आहेत. त्यांनी शाळेच्या लौकिकात भर घातली आणि पुढील तालुकास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व इतर शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच शाळा सुधारणा मंडळ, माजी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन लाभले.









