Destination Wedding Tips: पूर्वीपेक्षा आजकाल लग्नाच्या संकल्पना बदलल्या आहेत. अनेत तरूण-तरूणींना आपले लग्न सगळ्यात वेगळे करायचे असते. आणि या आठवणी जपून ठेवायच्या असतात. डेटिंग वेडिंगची सर्वाधिक क्रेझ आजकाल पाहायला मिळत आहे. खास मित्र आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नाच्या बंधनात अडकण्यासाठी जोडपी दुसऱ्या शहरात किंवा परदेशात जाण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे तुम्हीही डेस्टिनेशन वेडिंगचा विचार करत असाल तर या काही महत्तवाच्या टिप्स लक्षात ठेवा. ज्याचे प्लॅनिंग परफेक्ट असेल तर त्याचा कोणताही इव्हेंट
योग्य ठिकाण निवडा
भव्यदिव्य लग्न करण्याची इच्छा आहे पण योग्य ठिकाण निवडले नाही तर संपूर्ण योजना वाया जाते. त्यामुळे लग्नासाठी स्थळ निवडताना पाहुण्यांचा सुरुवातीला विचार करा. आपण आमंत्रित केलेल्या पाहुण्यांना त्या ठिकाणी पोहोचणे सोपे आहे का? डेस्टिनेशन वेडिंगमध्ये पाहुण्यांची संपूर्ण जबाबदारी होस्टची असते, त्यामुळे तुमचे बजेटही तपासा.गोवा,केरळ,उदयपूर,जोधपूर,अंदमान आणि निकोबार बेटे,आग्रा,ऋषिकेश,मसुरी,शिमला अशी भारतातील अनेक ठिकाणे लग्नासाठी योग्य आहेत.
स्वतःच बना वेडिंग प्लॅनर
डेस्टिनेशन वेडिंगसाठी एखाद्या इव्हेंट कंपनीची नियुक्ती करून पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही स्वत: याची जबाबदारी घ्या. यामुळे जादा पैसे खर्च होणार नाही.शिवाय मानसिक त्रासही होणार नाही. ज्या रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये लग्नाचे फंक्शन बुक केले आहे तेथील कर्मचारीही तुम्हाला लग्नाच्या सर्व तयारीसाठी मदत करतात याचा तुम्ही तुमच्या नियोजनासाठी फायदा करून घ्या.
पाहुण्यांची अशी घ्या काळजी
लग्नाला बोलावलेल्या पाहुण्यांचे स्वागत आणि त्यांची काळजी घेण्यासाठी तुमच्या जवळचे नातेवाईक किंवा मित्राला जबाबदारी द्या . जेणेकरून पाहुणे कार्यक्रमस्थळी सहज पोहोचू शकतील आणि त्यांना त्रास होणार नाही. रिसॉर्ट बुकिंग करताना लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना रिसॉर्टच्या ठिकाणी आणण्याची आणि सोडण्याची जबाबदारी त्यांची असेल हे आधीच स्पष्ट करा.यामुळे त्यांचाही गोंधळ होणार नाही.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









