बंगळूर येथील एका खाजगी कंपनीत डिझायनर म्हणून कार्यरत असणाऱ्या आशिष वामन सुतार (वय,३३) या युवकाचा हुबळी जवळ अपघाती मृत्यू झाला आहे. याबद्दल समजलेली अधिक माहिती अशी कि, आशिष यांच्या साठी त्यांच्या घरी वधू संशोधनाचे कार्य सुरू होते. त्यानिमित्त आशिष हा बंगळूरहुन गडहिंग्लज कडे येत होता. आज दि.२९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आशिष आपल्या दुचाकी वरून हुबळी नजीक आला असता त्याच्या दुचाकीला जोरदार अपघात झाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. आशिष हा बंगळूर येथील खाजगी कंपनीत सिनिअर डिझायनर स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत होता. आशिष हा मूळचा कानोली ता – आजरा येथील असून गेल्या काही दिवसा पासून गडहिंग्लज शहरातील भगतसिंह रोड परिसरात राहत होता. त्यामुळे गडहिंग्लजसह कानोली परिसराला या अपघातामुळे धक्का बसला आहे. आशिष याच्या मागे आई,वडील,भाऊ,भावजय असा परीवार आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









