वृत्तसंस्था / चेन्नई
अर्जुन देशवालने कारकिर्दीतील सर्वोत्तम 26 गुण मिळवित उत्कृष्ट कामगिरी केल्याने मंगळवारी प्रो कब•ाr लीगमध्ये तामिळ थलैवाजने पाटणा पायरेट्सवर 56-37 असा दमदार विजय मिळवला. देशवालसाठी हा सामना संस्मरणीय ठरला त्याने 71 वे सुपर 10 गुण नोंदवत यजमान संघाकडून प्रभावी कामगिरी केली. पीकेएलच्या इतिहासातील तो सर्वाधिक सुपर 10 नोंदवणारा तिसरा खेळाडू आहे.
नितेश कुमारनेही रात्री आपला हायफाईव्ह पूर्ण केला. तर नरेंदर कंडोला आणि आशिष यांनी अनुक्रमे सहा आणि पाच गुण नोंदवले. थलैवाजने 56 गुण नोंदवत या हंगामात सर्वाधिक गुण नोंदवण्याचा विक्रम केला. पटना पायरेट्ससाठी अयान लोहचब आणि अंकित राणा यांनी सुपर 10 नोंदवले जे त्यांच्या संघासाठी पुरेसे नव्हते.
देशवाल आणि लोहचब या दोन मुख्य रेडरनी जलद सुरूवात करून आपापल्या संघासाठी खाते उघडले. लोहचबने प्रथम तमिळ थलैवाजच्या बचावफळीवर आक्रमण केले आणि सुपर रेड करीत दोन्ही संघांमधील अंतर वाढवले. अंकित राणा देखील पायरेट्ससाठी उत्तम खेळत सुरूवातीला त्यांना आघाडी मिळवून दिली. आशिष आणि हिमांशुने यजमानांना फार दूर ठेवले नाही. परंतु अखेर नवदीपच्या टॅकलमुळे त्यांनी सामन्यातील पहिल्या ऑल आऊट गमावला. ज्यामुळे पायरेट्सना चार गुणांची सुरूवात मिळाली. पराभवानंतरही थलैवाज पहिल्या 10 मिनिटानंतर 13-11 असे गुण मिळवित आशा जिवंत ठेवल्या.
पण यजमान संघाला सामन्याला कलाटणी देण्यास जास्त वेळ लागला नाही. नितेशकुमार आणि आशिष यांनी दोन टॅकल गुण मिळवित सामना 14-14 असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर नितेशकुमारने टॅकल करीत थलैवाजला ऑल आऊट मिळवून देत त्याची परतफेड केली आणि त्यांना चार गुणांची आघाडी मिळवून दिली. देशवालने ती आघाडी आणखी वाढवत आठवा सुपर 10 पूर्ण केला. पायरेट्ससाठी अंकित राणाने काही चढाया करून त्यांचे आव्हान टिकवून ठेवले. परंतु यजमान संघाची गती त्यांना रोखता आली नाही. पहिल्या हाफच्या अखेरीस तमिळ थलैवाजने दुसऱ्यांदा ऑल आऊट करून खेळावर आपले वर्चस्व कायम ठेवले आणि 30-19 अशी 11 गुणांची आघाडी घेतली. राणाने आपला सुपर 10 पूर्ण केला. ज्यामुळे त्यांच्या संघाची तूट नऊ गुणांपर्यंत कमी झाली आणि दुसऱ्या हाफच्या सुरूवातीला पायरेट्सला संधी मिळवून दिली.
तथापि, नरेंदर कंडोलाने यशस्वी डू ऑर डाय रेड टाकली. त्यानंतर अरुलनंथबाबूने टॅकल करून तमिळ थलैवाजला खेळावर नियंत्रण मिळवून दिले. दरम्यान, लोहचबनेही आपला सुपर 10 नोंदवत झुंज चालू ठेवली. थलैवाजच्या नियंत्रणाखाली नितेशकुमारने हंगामातील त्याचा पाचवा हायफाईव्ह पूर्ण केला. तर देशवालने नियंत्रण पुढे चालू ठेवले आणि त्यांच्या संघाला खेळाची आठ मिनिटे राहिली असताना 14 गुणांची आघाडी मिळवून दिली. त्याच्या संघाने आशिषच्या टॅकलमुळे तिसऱ्यांदा ऑल आऊट केले आणि त्यानंतर विजयही निश्चित केला.









