करासवाडा-म्हापसा येथील घटना, शेकडो शिवप्रेमींकडून कारवाईची मागणी : आठ दिवसात संशयितास अटक करण्याचे पोलिसांचे आश्वासन
म्हापसा : करासवाडा-म्हापसा येथील शिवपुतळ्याची अज्ञाताने विटंबना केल्यामुळे सोमवारी सकाळपासून वातावरण तंग होते. रात्री उशिरा हे कृत्य शिवपुतळ्dयाच्या बाजूलाच असलेल्या तीन गाळ्dयांच्या मालकाने केल्याच्या संशयावऊन शिवप्रेमींनी त्या तीन गाळ्dयांची व बाजूला असलेल्या वाहनांचीही तोडफोड केली. संशयितालाही मारहाण कऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. रात्री उशिरा म्हापसा पोलीस स्थानकावर 500 हून अधिक शिवप्रेमींनी मोर्चा काढून संशयितावर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच वास्कोतील फादर बोलमॅक्स परेराच जबाबदार असल्याचे मानून शिवप्रेमींनी त्यांना तिथे आणण्याची एकच मागणी पोलिसांकडे लावून धरली होती.
आकई-करासवाडा, म्हापसा येथे औद्योगिक वसाहत प्रवेशद्वाराच्या बाजूला उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्dयाची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. तेथे बाजूलाच असलेल्या होडेकार हॉटेलचे मालक महाबळेश्वर तोरस्कर यांना ही घटना समजताच त्यांनी इतर शिवप्रेमींना याची माहिती दिली. म्हापसा पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा कऊन पोलीस बंदोबस्त ठेवला. स्वराज गोमंतक संघटनेतर्फे सकाळी 11 वाजता सर्व शिवप्रेमींनी घटनास्थळी जमण्याचे आवाहन केल्यानंतर दुपारपर्यंत बरेच शिवप्रेमी जमा झाले. त्यांनी त्या समाजकंटकाला त्वरित अटक करण्याच्या मागणीवर जोर देत पोलिसांना धारेवर धरले. या घटनेमुळे वातावरण तंग झाले. त्यांना आवरताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी हे प्रकरण हाताळले.
खासदार श्रीपाद नाईक, मंत्री नीळकंठ हळर्णकर, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, हळदोणचे आमदार कार्लुस फरेरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी कऊन यात गुंतलेल्या संशयितास त्वरित अटक करण्याची मागणी केली. महाराजांचा विटंबना केलेला पुतळा आम्ही बाजूला ठेवला असून संध्याकाळपर्यंत नवीन पुतळा बसविण्यात येईल, अशी माहिती आमदार कार्लुस फरेरा व स्वराज गोमंतक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत वाळके यांनी दिली.
विटंबनेचा प्रकार पहिलाच : महाबळेश्वर तोरस्कर
मुगल, पोर्तुगीज, ब्रिटिश यांच्यानंतर राज्यात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर समाजकंटकाने हल्ला केला आहे. म्हापसा पोलिसांनी यावर त्वरित कारवाई कऊन त्या हल्लेखोरास आठ दिवसांच्या आत अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. अशा हल्लेखोरांना आताच रोखा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतऊ, असा इशारा महाबळेश्वर तोरस्कर यांनी दिला आहे.
सर्व बाजूने चौकशी सुरू : अधीक्षक निधीन वाल्सन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केल्याची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक सीताकांत नायक, उपअधिक्षक जिवबा दळवी यांच्यासह आपण पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आजूबाजूचे सीसीटिव्ही पॅमेरे, आजूबाजूच्या लोकांची चौकशी तसेच रात्रीच्यावेळी कामास जाणाऱ्या लोकांकडून काही माहिती मिळते काय? याबाबत तपास सुरू आहे, असे पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.
देशाच्या संस्कृती, एकतेवर आघात करणारी घटना : श्रीपाद नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्रीपाद नाईक यांनी, घटनेचा निषेध व्यक्त कऊन ही घटना देशाच्या संस्कृतीवर, एकतेवर आघात करणारी आहे. या हल्लेखोरास लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
लाजीरवाणी घटना : जोशुआ डिसोझा
आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या मूर्तीची विटंबना करण्याची गोष्ट गंभीर आणि लाजीरवाणी असून यात गुंतलेल्या संशयितास ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
आठ दिवसांच्या आत आरोपीला पकडावे : प्रशांत वाळके
हिंदू धर्मात तुटलेली मूर्ती जास्त काळ ठेवत नाहीत म्हणून मोडतोड करण्यात आलेली मूर्ती बाजूला केली आहे, मात्र संध्याकाळी 7 वा. तेथे नवीन मूर्ती बसविण्यात येणार असल्याची माहिती स्वराज संघटनेचे प्रशांत वाळके यांनी दिली. महाराजांच्या मूर्तीची मोडतोड करणाऱ्या हल्लेखोराला आठ दिवसांच्या आत पकडून लोकांसमोर उभे करावे, अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.
आयडीसीकडून जागा घेऊन महाराजांचा पुतळा उभारणार : कार्लुस फरेरा
आमदार कार्लुस फरेरा यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. मडगावहून महाराजांची नवीन मूर्ती आणून संध्याकाळी याठिकाणी बसविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत असल्याने आयडीसीकडे महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी नवीन जागेची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवीन शिवपुतळ्याची प्रतिष्ठापना
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्dयाच्या विटंबनेमुळे सोमवारी दिवसभर वातावरण तंग होते. शेवटी सायंकाळी 6 वा. मडगावहून छत्रपती शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा आणून त्याची त्याच ठिकाणी प्रतिष्ठापना केल्यानंतर जमलेले शिवप्रेमी शांत झाले व ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याहस्ते महाराजांच्या पुतळ्dयाचे विधीवत पूजन व जलाभिषेक कऊन स्थापना करण्यात आली. यावेळी आमदार कार्लुस फरेरा, आमदार प्रेमेंद्र शेट, माजी केंद्रीय मंत्री अॅड. रमाकांत खलप, स्वराज गोमंतकचे अध्यक्ष प्रशांत वाळके, हिंदू जनजागृती समितीचे जयेश थळी आदींची उपस्थिती होती.









