वृत्तसंस्था/ पॅरिस
डिडिएर देशाँ यांनी बुधवारी पुढील विश्वचषक स्पर्धेनंतर फ्रान्सचे प्रशिक्षक म्हणून ते काम चालू ठेवणार नाहीत, असे जाहीर केले आहे. यामुळे एका दशकापेक्षा अधिक काळ देशाचे सर्वांत यशस्वी व्यवस्थापक राहिल्यानंतर एका युगाची समाप्ती होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
56 वर्षीय देशाँ यांनी एका मुलाखतीत सांगितले की, 2026 च्या उन्हाळ्यात त्यांचा करार संपल्यावर ते निघून जातील. ‘मी 2012 पासून येथे आहे, मी 2026 पर्यंत म्हणजे पुढील विश्वचषकापर्यंत येथे राहणार आहे. पण तिथेच ते संपणार आहे. कारण ही वाटचाल कधी तरी संपली पाहिजे’, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. लॉरेंट ब्लँकचे उत्तराधिकारी म्हणून देशाँ यांनी या भूमिकेला सुऊवात केली.









