प्रतिनिधी /पर्वरी
पर्वरी परिसरातील बिठोण, एकोशी, पिळर्ण या गावात जुन्या पद्धतीची कौलारू घरे अजूनही आहेत. पण त्यांची डागडुजी करण्यासाठी लागणारी कौले तसेच मजूर सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ती जपणे खर्चिक झाली आहेत. ही पर्वरी परिसरातील जुन्या पद्धतीची कौलारू घरे असून ती सुस्थितत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील गावात, किनारपट्टी लागत अशी घरे आजही दिसत आहेत. ही कौलारू घरे तापमानाचे संतुलन राखत घरात गारवा कायम ठेवतात. हे विशेष आहे.
पावसळय़ाआधी घरावरील कौलांची डागडुजी केली जाते. वर्षभरात फुटलेली ,सरकलेली कौले दरवषी नीट लावली जातात. या कामाला ग्रामीण भागात ‘घर शिवणे’ म्हणतात. मे महिन्याच्या दुसऱया किंवा तिसऱया आठवडयाल्या ही कामे सुरू होत असतात. यासाठी वाडय़ावरील प्रत्येक घरातील जुनीजाणती माणसे एकमेकाकडे जावून ही कामे करत असतात. रखरखत्या उन्हात काम करून दुपारी घरावरून खाली उतरतात. त्यावेळी सर्व अंग काळेच झालेले असते. पण आज गावातील जुन्या जाणत्या माणसांचे वय झाल्याने तसेच तरुण मुलांना त्याची फारशी माहिती नसल्याने गेले काही वर्षे मजूर लावले जात आहेत. सदया अनेक ठिकाणी कौले काढून पत्रे वापरले जात असल्याने हे काम करणारे मजूर सुद्धा उरले नाहीत. कौलांचा वापर कमी झाल्याने मातीची कौले मिळणेही कठीण झाले आहेत. म्हापशात केवळ एक दोन ठिकाणी दुकाने शिल्लक आहेत.
बिठोन येथील रहिवाशी रविराज शेट यांनी माहिती दिली की, पूर्वी गावात बहुतांश घरे ही कौलांची होती. पण सदया कौलांची किंमत खूप वाढल्या आहेत तसेच ते काम करणारे कुशल कामागरही मिळत नाही. त्यात तसेच दरवषी करावी लागणारी डागडुजी यामुळे अनेकांनी कौले काढून सिमेंट किंवा लोकांडी पत्रे घालणे पसंद केले आहे. काही जण घरावर प्लॅस्टिक टाकून तात्पुरती पावसा पुरती सोय करतात. पण अजूनही काहीनी अट्टाहासाने कौलची घरे जपली आहेत. कारण कौलामुळे घर थंड राहत असून घरातील हवासुद्धा शुद्ध राहण्यास मदत होते. कौलारू घराना लागणाऱया कौलांची किमतीसुद्धा वाढलेल्या आहेत. आज म्हापसा येथे मोठी कौले 27 रुपये तर छोटी कौले (पाटणे ) 70 रुपये अशी आहेत. यातील छोटी कौले (पाटणे) साहसा कुठे मिळत नसल्याने घर मालक कौलांची अदलाबदल करून आपली गरज भागवत आहेत. तर काही जण अर्धा भागात कौले तर अर्ध्या भागात पत्रे घालताना दिसत आहेत. तरुण पिढीला या कामात रस नाही. त्यामुळे ते या कामात लक्ष घालत नाहीत.









