भाजप नेत्याला अटक, अनेक कलमांच्या अंतर्गत गुन्हा नोंद
वृत्तसंस्था / चेन्नई
तामिळनाडू पोलिसांनी सोमवारी माजी मुख्यमंत्री दिवंगत एम. करुणानिधी आणि त्यांच्या कन्या तसच थुथुकुडीच्या खासदार कनिमोझी यांच्याविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी भाजप नेत्याला अटक केली आहे. दक्षिण विल्लुपुरमचे जिल्हा उपाध्यक्ष व्ही.ए.टी कालीवर्धन यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
विल्लुपुरम जिल्ह्यातील विक्रांवडी येथे एका कार्यक्रमात बोलताना भाजप नेत्याने कथितपणे अपमानास्पद टिप्पणी केली होती. भाजप नेत्याच्या विरोधात भादंविचे कलम 153 (दंगल भडकविण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून चिथावणी देणे), 504 (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून अपमान करणे), 505 (1)(क) (समुदायाच्या कुठल्याही वर्ग किंवा व्यक्तींना अन्य वर्ग किंवा समुदायाच्या विरोधात गुन्हा करण्यासाठी चिथावणी देण्याच्या उद्देशाने ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.