चिपळूण :
प्रदूषणमुक्त हरित संकुलाच्यादिशेने एक पाऊल पुढे टाकत डेरवण येथील श्री विठ्ठलराव जोशी चॅरीटीज् ट्रस्टने पुढाकार घेऊन वालावलकर रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभाग आता सौर ऊर्जेने प्रकाशित केला आहे. ज्यामुळे या विभागातील सी. टी. स्कॅन व एम.आर.आय. स्कॅन, रेडीएशन युनिटससह सर्व बाह्यरुग्ण ओ.पी.डी विभागातील कामे सुलभ होणार आहे. नुकताच हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणारा कोकणातील हा पहिलाच प्रकल्प आहे.
सौर ऊर्जा निर्माण होताना कार्बन उत्सर्जन किंवा स्थानिक वायू प्रदूषण निर्माण होत नाही. पवन आणि जलविद्युत यासारख्या इतर अक्षय ऊर्जा स्त्रोतांसाठी फार खर्चिक यंत्रणा असणे आवश्यक आहे. पण त्यापेक्षा सौर ऊर्जा हा उत्तम पर्याय आहे. कारण त्याकरिता केवळ इमारतीच्या छतावर किंवा खासगी, मालमत्तेत देखील सौर पॅनेल्स बसवून ऊर्जा निर्माण करता येते.








