कायदा-सुव्यवस्था विभागाचे रोहन जगदीश नवे उपायुक्त
प्रतिनिधी/ बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आयपीएस अधिकारी रोहन जगदीश यांची वर्णी लागली आहे.
शनिवारी राज्यातील दहा आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून यामध्ये बेळगाव येथील पोलीस उपायुक्तांचाही समावेश आहे. एक-दोन दिवसांत आणखी बदल्या होणार आहेत. शेखर एच. टी. हे विधानसभा निवडणुकीपूर्वी बेळगावात रुजू झाले होते. त्यांनी अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.
रोहन जगदीश हे 2019 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गणेशोत्सवाच्या तोंडावर पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आली आहे.









