गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद
बेळगाव : कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी यांनी रविवारी शहराच्या विविध भागात फेरफटका मारला. यावेळी मार्केट उपविभागातील अधिकारी त्यांच्यासमवेत होते.गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा केली. श्री सिद्धीविनायक मंदिर, मोतीलाल चौक गणेशोत्सव मंडळ, भेंडीबाजार, टेंगिनकेरा गल्ली, खंजर गल्ली, खडेबाजार, चव्हाट गल्ली व जुने धारवाड रोड परिसरात त्यांनी फेरफटका मारला. यावेळी मार्केटचे प्रभारी एसीपी सदाशिव कट्टीमनी, पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर आदी अधिकारी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.









