या प्रकरणी दोन संशयितांना अटक
मुंबई
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बे उडविण्याची धमकी देणारे ई-मेल गोरेगाव पोलिस ठाण्यात प्राप्त झाले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहित अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलिस यांनी संयुक्त कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. मंगेश अच्युतराव वायल (३५) आणि अभय गजानन शिंगाणे (२२) अशी आरोपींची नावे आहेत. हे दोन्ही आरोपी देवळगाव मही (जि. बुलढाणा) येथील आहेत. त्यांना देवळगाव येथून अटक केली असून, अधिक चौकशी सुरु आहे.
Previous Articleमराठा मंडळ संस्थेतर्फे शिवजयंती साजरी
Next Article गजानन महाराजांचा प्रगट दिन उत्साहात साजरा








