उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे
युवा नेते दिनेश गावडे यांना आश्वासन
आंबोली प्रतिनिधी
चौकुळ गावचा कबुलायतदार गावकर प्रश्न लवकरच निकाली निघेल असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यानी आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिंदे शिवसेनेचे युवा नेते दिनेश गावडे यांना दिले.आंबोली चौकुळ जिल्हा परिषद मतदारसंघात गेली पंधरा वर्षे सामाजिक व सांस्कृतिक काम करीत असलेले शिंदे शिवसेनेचे शिलेदार दिनेश गावडे यांनी आंबोली चौकुळ गावच्या विविध प्रश्रासंबंधी उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांची कोल्हापूर कणेरी मठात भेट घेतली आणि चौकुळ कबुलायतदार गावकर प्रश्न बाबत त्यांचे लक्ष वेधले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्याशी चर्चा करून हा प्रश्र लवकरात निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिनेश गावडे यांनी काडसिध्देश्र्वर महाराज यांचेही दर्शन घेत कृपाशीर्वाद घेतला. यावेळी काड सिध्देश्वर स्वामी, ऋषीकेश पाटील व भक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.









