ऑनलाईन टीम/तरुण भारत
Pandharpur Kartiki Ekadashi 2022 | कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) निमित्त आज पंढरपुरात (Pandharpur) अनेक भाविक आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. अशातच कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी वारीनिमित्त शासकीय महापूजा पार पडली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Ddevendra Fadnavis) आणि पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.यंतर यावर्षी मनाचे वारकरी म्ह्णून औरंगाबाद मधील फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील गावी राहणारे उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना पूजेचा मान मिळाला. यावेळी सोलापूरचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज मला विठूमाऊलीची पुजा करण्याची संधी मिळाल्याने मी अतिशय समाधानी आहे. हा अतिशय भाग्याचा योग असल्याचंही ते म्हणाले.
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात वैष्णवांचा मेळा भरला आहे. विठ्लाच्या नामाने सर्वत्र मंगल आणि भक्तिमय वातावरण झाले आहे. कार्तिकी एकादशी निमित आज पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रक्मिणीची महापूजा केली. यावेळी विठुरायाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला आणि त्यानंतर मंत्रोपचाराने विठूरायाची यथासांग पूजा संपन्न झाली. मागील ५० वर्षे वारी करणाऱ्या औरंगाबाद जिल्ह्यातील माधवराव साळुंखे दाम्पत्याला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांबरोबर विठ्ठलाची पुजा करण्याचा मान मिळाला. माधवराव साळुंखे हे समाज कल्याण विभागातून सेवानिवृत्त झाले असून मागील ५० वर्ष ते पंढरीची वारी करीत आहेत.
पुढे बोलताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “विठ्ठल हा सामान्य माणसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा देव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस यावेत. त्यांचे जीवन सुजलाम सुफलाम व्हावे यासाठी काम करण्याची शक्ती आम्हाला मिळावी. आम्ही अशी प्रार्थना नेहमीच विठ्ठलाला करत असतो. ही पुजा मनाला शांती देणारी असते.” कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापुजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या हस्ते करण्यात आली. तर यावेळी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबादमधील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.
पंढरपूरच्या विकासासाठी काशी विश्वनाथच्या धरतीवर कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे हा २००० कोटींचा विकास आराखडा असून हा विविध टप्प्यांमधून होईल. या विकासातून कोणालाही विस्थापित केले जाणार नाही तर विस्थापितांना प्रस्थापित करण्याचे काम होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.