कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सिल्लोड कृषी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पाच दिवसांच्या महोत्सवासाठी महोत्सवात येणाऱ्या बियाणे आणि खत व्यापारी आणि विक्रेत्यांकडून विविध मार्गांनी निधी गोळा करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे असे आरोप त्यांच्यावर होत आहे. कृषीमंत्र्यांवर होणाऱ्या आरोपामुळे हा महोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
कृषी उत्पादने, उपकरणे आणि शेती तंत्रज्ञानाशी संबंधित प्रदर्शन होत असलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी झाले. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुध्या या महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात होते. कार्यक्रमाच्या पोस्टरवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री झळकले होते पण त्याच्या अनुपस्थीतीमुळे राजकिय क्षेत्रात एकच चर्चा होत असून मुख्यमंत्र्यांनी या महोत्सवाकडे पाठ फिरवून सत्तार यांच्यापासून सुरक्षित अंतर राखल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्री सत्तार यांच्या मतदारसंघात होणारा हा कृषी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रवेश पास विकून निधी गोळा करण्यासाठी आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी सत्तारांवर केला आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी सत्तार आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडून मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.
Previous Articleमहिलेने भर बाजारात तळीरामाला दिला चोप
Next Article बारामतीत अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला!









