मुंबई/प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांच्या मंत्रालयीन दालनात राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराच्या सुशोभीकरणासंदर्भात आज आढावा बैठक घेतली. या बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे, यांसह संबंधित विभागांचे अधिकरी उपस्थित होते. तसेच पुणे व कोकण विभागाचे विभागीय आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे, PWD विभागाचे अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.









