आयपीओतून 4 हजार कोटी उभारणार : 6 ऑगस्टला समभाग होणार सुचिबद्ध
वृत्तसंस्था/ मुंबई
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड यांचा आयपीओ शेअर बाजारात लॉन्च केला जाणार आहे. 30 जुलैला आयपीओ लॉन्च केला जाणार असून या आयपीओ अंतर्गत 4000 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली लावण्यासाठी 29 जुलैला आयपीओ खुला होणार आहे. कंपनीने या आयपीओची इशू किंमत 760 ते 800 रुपये प्रति समभाग अशी निश्चित केली आहे.
सदरचा आयपीओ हा ऑफर फॉर सेल असेल. या अंतर्गत जवळपास 5.01 कोटी समभागांची विक्री केली जाणार आहे. समभाग विकणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयडीबीआय बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि एसयुयुटीआय यांचा समावेश आहे.
दुसरी मोठी डिपॉझिटरी कंपनी
आयपीओ एक ऑगस्टपर्यंत सबक्रीप्शनसाठी खुला राहणार असून 6 ऑगस्टला बीएसईवर समभाग सूचीबद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आयपीओ सादरीकरणानंतर एनएसडीएल ही देशातली दुसरी सर्वात मोठी डिपॉझिटरी कंपनी बनणार आहे. या आधी सूचीबद्ध होण्यामध्ये सीडीएसएल यांचा वाटा होता.
कंपनी काय करते
एनएसडीएल ही बाजारातील नियामक संस्था सेबी नोंदणीकृत बाजार पायाभूत सुविधा संस्था आहे. ही कंपनी भारतातील वित्त आणि सिक्योरेटीज बाजाराला खूप साऱ्या सेवा प्रदान करते. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये एनएसडीएलने 24 टक्के वाढीसह 343 कोटी रुपयांचा नफा कमावला. याच दरम्यान 12 टक्के वाढीसह 1535 कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न कंपनीने प्राप्त केले होते.









