बेळगाव : डेपो मास्टर्स स्पोर्ट्स क्लब आयोजित व सुमीत रेडेकर पुरस्कृत डेपो मास्टर्स चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेपो मास्टर्स संघाने एसआरएस हिंदुस्थान संघाचा 6 गड्यांनी पराभव करुन डेपो मास्टर्स चषक पटकाविला. सामनावीर प्रेम पाटील याला गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात डेपो मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 99 धावा केल्या. पार्थ पाटीलने 4 षटकार 3 चौकारासह 46, जावेदने 1 षटकार 3 चौकारासह 22, तर प्रवीण व हरिष यांनी प्रत्येकी 12 धावा केल्या. चिकोडीतर्फे आनंद बी.ने 3 तर प्रत्युत्तरादाखल खेळताना चिकोडी संघाने 8 षटकात 8 गडी बाद 78 धावाच केल्या.
त्यात दीपक कांबळेने 1 षटकार 4 चौकारासह 24, आनंदने 13, विनोद तावळेने 11 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे अक्षय धोंगडीने 12 धावांत 3 गडी बाद केले. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात साईराज वॉरियर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 82 धावा केल्या. त्यात कल्पेश संभोजी व राहुल कदम यांनी 2 षटकार 3 चौकारांसह प्रत्येकी 30 धावा केल्या. एसआरएस हिंदुस्थानतर्फे श्रेयस म्हात्रेने 10 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थानने 7.4 षटकात 6 गडी बाद 84 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. त्यात नरेंद्र मांगोरेने 1 षटकार 7 चौकारांसह 39, श्रेयेशने 13 तर चेतन पांगिरेने 12 धावा केल्या. साईराजतर्फे संतोष जाधवने 2 गडी बाद केला.
अंतिम सामन्यात एसआरएस हिंदुस्थानने 8 षटकात 9 गडी बाद 66 धावा केल्या. त्यात विनायक कांबळेने 13, शफीकने 12 तर संतोष कांबळेने 10 धावा केल्या. डेपो मास्टर्सतर्फे पार्थ पाटीलने 12 धावांत 4, अमोल यल्लुपाचेने 17 धावांत 2 तर अजिमने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना डेपो मास्टर्स संघाने 7.5 षटकात 4 गडी बाद 67 धावा करुन सामना 6 गड्यांनी जिंकला. त्यात प्रवीण कदमने 2 षटकार 2 चौकारासह 30, राजेश व हरिष यांनी प्रत्येकी 11 धावा केल्या. एसआरएसतर्फे नरेंद्र मांगोरेने 20 धावांत 2 तर संतोष कांबळेने 1 गडी बाद केला.
प्रमुख पाहुणे सुरज डांगे, मंगेश कुशे, रवी पाटील, आनंद सराफ, निखिल पाटील, कमल मल्होत्रा, प्रशांत कलघटगी व सुमित रेडेकर यांच्या हस्ते विजेत्या संघाला 55,555 रुपये रोख, चषक तर उपविजेत्या 33,333 रोख रक्कम, चषक देवून गौरविले. उत्कृष्ट फलंदाज नरेंद्र मांगोरे, उत्कृष्ट गोलंदाज अक्षय धोंगडी, सामनावीर पार्थ पाटील, मालिकावीर दीपक कांबळे यांना चषक देवून गौरविले. पंच म्हणून जोतिबा पवार, तेजस पवार, बाबु एम., इरफान खिलेदार, स्कोरर म्हणून प्रवेश पाटील यांनी तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रसाद नाकाडी, प्रभाकर कंग्राळकर, अनंत कुऱ्याळकर यांनी काम पाहिले.









