बेळगाव : साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित नवव्या साईराज चषक ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात डेपो मास्टर्स, श्री गणेश शुक्रवार पेठ, नील बॉईज हिंडलगा, इंडियन बॉईज यमकनमर्डी संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. गिरीश नाडकर्णी, राकेश खानापूर, मनीष कोलेकर, मारुती के., साकिब खान यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. डेपो मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात डेपो मास्टर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 102 धावा केल्या. त्यात गिरीश नाडकर्णीने 3 षटकारांसह 46, पवनने 22 तर रोहितने 13 धावा केल्या. वडगावतर्फे मोहितने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वडगाव चॅलेंजर संघाने 8 षटकात 9 गडी बाद 49 धावा जमविल्या. डेपो मास्टर्सतर्फे सर्वेश निखिल व प्रतिक यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात श्री गणेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 गडी बाद 102 धावा केल्या. त्यात राकेशने 8 षटकारासह 77, अक्षयने 22 धावा केल्या. कार्पोरेशनतर्फे रमेश व हनुमंत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना कार्पोरेशन संघाने 8 षटकात 6 गडी बाद 36 धावा केल्या. शुक्रवार पेठतर्फे शेखरने 3, यल्लेश व आकाश यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तिसऱ्या सामन्यात श्री स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 4 गडी बाद 53 धावा केल्या. त्यात प्रकाशने 24 तर राहुलने 13 धावा केल्या. नील बॉईजतर्फे किरण पाटीलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना नील बॉईजने 3.5 षटकात 2 गडी बाद 54 धावा करून सामना 8 गड्याने जिंकला. त्यात मनीषने 25 धावा केल्या. चौथ्या सामन्यात यमकनमर्डी संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 61 धावा केल्या. त्यात मारुतीने 17 तर मुलींनी 13 धावा केल्या. एसके स्पोर्ट्सतर्फे रोशनने 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसके स्पोर्ट्सने 8 षटकात 8 गडी बाद 50 धावा केल्या. त्यात धोंडीबाने 15 धावा केल्या. यमकनमर्डीतर्फे महांतेशने 3 तर मारुतीने 2 गडी बाद केले.









