प्रतिनिधी / बेळगाव
क्लब रोडवरील लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या शाखेत बुधवार दि. 19 रोजी मोफत दंतचिकित्सा शिबिर पार पडले. यावेळी द व्हाईट डेंटल क्लिनिकचा डॉ. स्नेहा गुर्जर व डॉ. निकिता गुर्जर यांनी शिबिरात दंत तपासणी
केली.
याप्रसंगी शाखा व्यवस्थापिका ज्योती गंभीर, साहाय्यक व्यवस्थापक प्रकाश चौगुले, लेखा साहाय्यक आरती देशपांडे व अजय भोसले तसेच कीर्ती बांदिवडेकर व मदतनीस विवेक सावंत उपस्थित होते.









