वृत्तसंस्था/ म्युनिच
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या म्युनिच खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत डेन्मार्कचा विद्यमान विजेता होल्गेर रुनेने एकेरीची उपांत्य फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात 19 वर्षीय रुनेने चिलीच्या ख्रिस्टेन गॅरीनचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. रुनेचा उपांत्य फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाच्या ओकोनेलशी होणार आहे. चालू वर्षीच्या टेनिस हंगामात रुनेने आतापर्यंत चार स्पर्धांमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे.









