भीतीचे वातावरण : खबरदारी घेण्याची गरज
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर परिसरात पुन्हा डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाटील गल्ली, येळ्ळूर परिसरात हे रुग्ण आढळले आहेत. त्या रुग्णांवर खासगी इस्पितळांमध्ये उपचार सुरू आहेत.
मागीलवषी येळ्ळूरमध्ये डेंग्यूमुळे मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा यावषीही येळ्ळूर परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूसह इतर आजारांच्या रुग्णसंख्येमध्येही वाढ झाली आहे. पुन्हा साथीच्या आजारांनी डोकेवर काढले असून आता ग्राम पंचायतीने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
आरोग्य खात्याने खबरदारी घेण्याची गरज
डेंग्यूसारखा भयानक आजार उद्भवत असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणीसाठा करून ठेवू नये, तसेच साचलेले पाणी बाहेर काढणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची शक्मयता आहे. सध्या तीन रुग्ण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र अजूनही काही रुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा ग्राम पंचायत आणि प्राथमिक आरोग्य खात्याने जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.









