वार्ताहर / पणजी
भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात टोमॅटो 140 रुपये किलोने विकला जातो. हा शेतकऱ्यांवर आणि ग्राहकांवर अन्याय आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यास भाजप सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्ष बिना नाईक यांनी पणजी मार्केट केला.
गोवा प्रदेश महिला काँग्रेसतफर्ते येथील मार्केटमध्ये भाजपा राजवटीत महागाईच्या विरोधात निदर्शने करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी बीना नाईक यांनी महागाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल करत नरेंद्र मोदी सरकार दर आणि कर वाढवून जनतेची लूट करत असल्याचा आरोप केला. टोमॅटो महाग झाले आहेत. सरकार किमतीवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांना कमी मोबदला दिला जातो तर बाजारात पोहोचल्यानंतर गरिबांना महाग टोमॅटो खेरी करावा लागतो. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने बसमध्ये मोफत प्रवास करून महिलांना दिलासा दिला आहे. मात्र भाजप सरकार महिलांना न्याय देण्यास अपयशी ठरले आहे.
डॉ. प्रमोद साळगावकर म्हणाल्या की महागाईने सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत करण्यास भाजप सरकार जबाबदार आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर किमती कमी होतील. पण भाजप सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. लोक आज दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तू महागाईमुळे खरेदी करू शकत नाहीत. भाज्यांचे दर आवाक्याबाहेर गेल्यामुळे महिलांना टोमॅटो, कांदा, आले यांचा वापर न करता स्वयंपाक करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. भाजपाने किमतीवर नियंत्रण न ठेवल्यास इंडिया (राष्ट्रीय विरोधी पक्ष) त्यांना पुढील निवडणुकीत योग्य ती जागा दाखवेल, असे त्या म्हणाल्या.









