गोकुळ शिरगाव, प्रतिनिधी
कणेरी( ता. करवीर) येथील ग्रामपंचायत हद्दीमध्ये अवैधरित्या केलेल्या इमारतीचे बांधकाम ताबडतोब हटवावे अशी मागणी कणेरी येथील तरुण युवकांनी व ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच निशांत पाटील व नायब तहसीलदार विजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कणेरी ग्रामपंचायत हद्दीतील खाजगी जमिनीमध्ये कोणताही शासकीय परवाना नसताना,शिवाय जमीन एन. ए नसुन बांधकाम परवाना अथवा धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे कोणते प्रकारची नोंदणी न करता काही लोकांच्या समूहाने अवैधरित्या इमारतीचे बांधकाम केले आहे. सदर जागा बिगर शेती न करता कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ही इमारत बांधली आहे.तसेच ही इमारत हे राहते घर असून वापरात असल्याचे भासवले आहे.
सद्यस्थिती पाहता या इमारतीमध्ये धार्मिक गतविधीसाठी याचा वापर केला जात असून या इमारतीमध्ये अनोळखी लोकांचा वापर वाढला आहे .त्यामुळे या ठिकाणी संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे ग्रामस्थ बोलत आहेत.गावातील तरुणांनी या संदर्भात चौकशी केली असता या इमारतीचा कोणताही परवाना नसल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी आज एकत्र जमा होत हे अनधिकृत बांधकाम ताबडतोब पाडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायतचे सरपंच व नायब तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.याबाबतचा पुरावा म्हणून ग्रामस्थांनी या ठिकाणची काही छायाचित्रे व या जागेचा सातबारा या निवेदनामध्ये जोडला आहे.शिवाय यांच्यावर योग्य तो तपास करून संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केली आहे,यावेळी ग्रामपंचायत समोर तरुण युवक भगव्या टोप्या घालून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झाला होता.
Previous Articleकोल्हापूर शहरात रिमझिम पाऊस
Next Article मुरगूड परिसराला वळीवाने झोडपले









