शताब्दी अधिवेशनासाठी दुभाजक फोडले
प्रतिनिधी/ बेळगाव
शताब्दी अधिवेशनासाठी वीरसौधकडे जाण्यासाठी काँग्रेस रोडवरील दुभाजक फोडण्यात आले. शिवाय रस्ता खुला करण्यात आला आहे. मात्र मागील दहा वर्षांपासून पहिले रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक नागरिकांना अडथळा ठरणारे बॅरिकेड्स हटवा, अशी मागणी आंदोलनकर्ते सुभाष घोलप व स्थानिक नागरिकांनी केली आहे. शहरात काँग्रेस शताब्दी अधिवेशन होत आहे. यासाठी सजावट व तयारीला वेग आला आहे. राज्यातील मंत्री महोदय या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस रोड येथील वीरसौध येथे कार्यक्रम होणार असल्याने काँग्रेस रोडवरील दुभाजक फोडण्यात आले आहेत. वीरसौधकडे जाण्यासाठी रस्ता खुला आहे. त्याप्रमाणे रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.









