आमदार राजू सेठ यांना दिले निवेदन
बेळगाव : पाटीलमळा येथील मीनाक्षी भवनपासून रेल्वेस्थानकापर्यंतच्या नाल्यावर नवी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. या कामाकरिता अनुदान मंजूर करावे, असे निवेदन नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांना दिले आहे. 2019-20 यावर्षी पावसामुळे वॉर्ड क्र. 10 मधील नाल्याच्या बांधकामाची पडझड झाली होती. त्यामुळे 18 ते 20 घरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मीनाक्षी भवनच्या मागील भागात रेल्वे स्थानकापर्यंत नाल्यावर नवी भिंत बांधण्यासाठी आमदार निधीतून अनुदान मंजूर करावे. वॉर्डातील जनतेच्यावतीने ही मागणी करत असल्याचे नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी निवेदनात म्हटले आहे.









