बेळगाव : गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, व केळकर बाग येथे महानगरपालिकेच्या खुल्या जागेत समुदायभवन बांधून देण्यासाठी आज बेळगावच्या महापौर शोभा सोमंनाचे यांना वॉर्ड क्र. ७ चे नगरसेवक शंकर पाटील निवेदन दिले.
गणाचरी गल्ली, गवळी गल्ली व केळकर बाग येथे महानगर पालिकेच्या खुला जागे आहेत, तिथे कचरा टाकण्यासाठी, वाहने पार्किंगसाठी वापरल्या जात आहे तसेच अतिक्रमणही होत आहे. या जागेत समुदायभवन बांधून दिल्यास येथील नागरिकांना उपयोगी ठरेल, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.









