सावंतवाडीकरांसह अनेक संघटनांची मागणी
समाजसेवेचे भान असणारा देवदूत डॉ. मुरली मनोहर चव्हाण हे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायम लाभावा जेणेकरून शहरांमध्ये समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्यांची साथ मिळू शकेल व याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. म्हणून अशा प्रकारचे डॉक्टर हातातून निसटू नयेत याकरिता सावंतवाडी शहरातील नागरिकांसहित विविध संघटनांनी त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कायम स्वरूपी सेवा द्यावी अशी मागणी केली आहे .त्यासाठी या विषयासंदर्भात शहरातील अनेक सेवाभावी संघटनांमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
डॉ. मुरली मनोहर चव्हाण हे 2011- 12 मध्ये सावंतवाडी आयुर्वेदिक कॉलेज मधून बीएए एस ही पदवी घेऊन 2015 पासून आजपर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये निस्वार्थ व निशुल्कपणे रुग्णांची सेवा करत आहे. कोरोना काळामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे. कोरोना काळामध्ये जीवाची पर्वा न करता रुग्णांना वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. त्यांच्या या उत्कृष्ट सेवाभावी कामगिरीबद्दल कोविड योद्धा म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. सावंतवाडी शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. चितारी यांच्या हाताखाली त्यांनी बरीच वर्षे प्रॅक्टिस केली आहे. त्यामुळे पेशंटला योग्य पद्धतीने हाताळण्याचं ज्ञान त्यांना आहे.
सावंतवाडी शहरांमध्ये त्यांचा खूप मोठा मित्रपरिवार आहे. सावंतवाडी शहरातील रक्तदाता म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी हे त्यांचे अगदी जवळचे मित्र आहेत. देव्या सूर्याजी त्यांना नेहमीच सहकार्य करत असतात. जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर डॉ.मुरली यांना त्यांच्या उपजीविकेचे साधन बनावे म्हणून त्यांना सेवेत कायम रुजू होण्यासाठी नेहमीच प्रयत्न करत आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार व सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभते. तसेच मुस्लिम हेल्थ अँड वेल्फेअर फाउंडेशन चे अध्यक्ष तरबेज बेग, मोशिन मुल्ला, सोहाब बेग हे देखील त्यांना वेळोवेळी चांगले सहकार्य करत असतात. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व युवा रक्तदाता संघटना यांच्यासोबत देखील ते अनेकदा सामाजिक उपक्रम राबवताना दिसतात.असा समाजसेवेचा भान असणारा देवदूत सारखे डॉ. मुरली चव्हाण सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला कायमचे लाभावे जेणेकरून शहरामध्ये समाजसेवा करणाऱ्या समाजसेवकांना त्यांची साथ मिळू शकेल व याचा फायदा सर्वसामान्यांना होईल. म्हणून अशा प्रकारचे डॉक्टर हातातून निसटू नयेत याकरिता सावंतवाडी शहरातील नागरिकांसहित विविध संघटनेची मागणी आहे. त्यासाठी या विषयासंदर्भात शहरातील अनेक सेवाभावी संघटनेेंमार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.









